भागीदारी
कोणत्याही किफायतशीर व्यापार उद्योग करण्यासाठी जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ति एकत्र येऊन आपली संपत्ती, अंगमेहनत अगर कसब एकत्र करून त्या व्यापार उद्योगात होणारा नफा मान्य प्रमाणात वाटून घेण्याचा करार करतात, तेव्हा कायद्याच्या परिभाषेत अशा व्यक्तींमधील संबंधास भागीदारी असे म्हणतात.